शरद पवारांविषयी भाजपची ही अधिकृत भूमिका आहे का? राणेंच्या धमकीनंतर राऊतांचा मोदींना सवाल

शरद पवारांविषयी भाजपची ही अधिकृत भूमिका आहे का? राणेंच्या धमकीनंतर राऊतांचा मोदींना सवाल

बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठमे कठीण होईल अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. या धमकीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आता राणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय. राणेंच्या याच धमकींनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट सवाल केला आहे. शरद पवारांना राणेंनी दिलेली धमकी भाजपची भूमिका आहे का? असा प्रश्न राऊतांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे. राऊतांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.

नारायण राणे काय म्हणाले होते?

राज्यातील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बंडखोर आमदारांना किंमत मोजावी लागणार असा इशारा दिला. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्विट केलं आहे. यात राणेंनी म्हटले की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.”

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते?

बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. असा इशारा आता शरद पवारांनी दिला आहे.
तसेच बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे. जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत. मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावंच लागेल.” असही शरद पवार म्हणाले.


उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, जिल्हाप्रमुखांच्या बोलावल्या बैठका

First Published on: June 24, 2022 10:17 AM
Exit mobile version