प्रभादेवी गोळीबार प्रकरणी सदा सरवणकर अडचणीत? पोलिसांकडून पिस्तुल जप्त

प्रभादेवी गोळीबार प्रकरणी सदा सरवणकर अडचणीत? पोलिसांकडून पिस्तुल जप्त

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील राड्याप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणी आणखी भर पडण्याची शक्यता आहे. विसर्जनादिवशी झालेल्या या राड्यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेक़डून करण्यात आला होता. या आरोपांनंतर आता दादर पोलिसांनी सरवणकर यांच्या जवळील पिस्तुल जप्त केले आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात होती, यानंतर पोलिसांनी रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून पिस्तुलातील गोळी जप्त केली आहे.

प्रभादेवीत गणेश विसर्जन मिरवणुकीत राड्यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला होता. या गोळीबारात एक पोलीस जखमी होता होता वाचल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात होती.

नेमका वाद काय

अनंत चतुर्दशीनिमित्त प्रभादेवी परिसरात गणेश विसर्जन मिरवणुक सुरु होती. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटातील समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टाळला. मात्र शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला ज्यानंतर दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीही झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह उपस्थित शिवसैनिकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. ज्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.


कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी जगन्नाथ पुरी संघटनेकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र


First Published on: September 13, 2022 11:57 AM
Exit mobile version