चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’; सामनाच्या अग्रलेखातून पाटलांवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’; सामनाच्या अग्रलेखातून पाटलांवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे 'दादामियां'; सामनाच्या अग्रलेखातून पाटलांवर हल्लोबोल

शिवसेनेच मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून नेहमीच केंद्र सरकारवर आणि भाजपच्या नेत्यांवर टीका केली जाते. आज देखील औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटलांचा ‘दादमियां’ असा उल्लेख आज सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे भाजपच्या दादामियांनी इतिहास उकरुन काढू नये, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. तसंच ‘दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती. दादामियां, हे ध्यानात ठेवा’, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

‘औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायलाच पाहिजे. औरंगजेब आमचा वंशज नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, असं म्हणत भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागणी केली होती. याला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.

नक्की काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

“महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वागण्या-बोलण्याला तसा काही अर्थ उरलेला नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे राज्यातील मंडळी सध्या जे बोलतात आणि करतात त्यात त्यांचे वैफल्यच दिसून येते. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ हेसुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळ्यास लावीत आहेत. आता त्यांनी संभाजीनगरात जाऊन अशी आपटली आहे की, ”छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे ‘औरंगाबाद’चे नामकरण झालेच पाहिजे.” भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता या मंडळींची फक्त जीभच सटकली आहे असे नाही, तर बरेच काही सटकले आहे हे नक्की. त्यांचे म्हणणे असे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत. दादामियांनी हे स्वतःच जाहीर करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात कोणीही ‘औरंगजेबा’चे वंशज नाहीत. औरंगजेबाला महाराष्ट्राने कायमचे गाडले आहे. त्याबद्दल सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.


हेही वाचा – …म्हणून रश्मी ठाकरेंनी घेतली ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्रं!


 

First Published on: March 2, 2020 9:16 AM
Exit mobile version