बाबरी पाडली तेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते पळत होते, विनायक राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

बाबरी पाडली तेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते पळत होते, विनायक राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

बाबरी पाडली तेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते पळत होते, विनायक राऊतांचा देवंद्र फडणीसांवर पलटवार

बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तेव्हा भाजपचे नेते ढसाढसा रडत होते. तेव्हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशिद पाडणाऱ्यांना भक्कम पाठिंबा दिला होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता अक्कल दाढ आली का? असा पलटवार शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीवरुन शिवसेनेवर निशाणा साधला होता. बाबरी पाडण्यासाठी पुढे भाजपचे वरिष्ठ नेते होते. यावरुन आता राज्यातील राजकीय वर्तुळात वाद सुरु झाला आहे. तसेच मी स्वतः बाबरी मशिद पाडण्यावेळी तिथे उपस्थित होतो असा दावासुद्धा फडणवीस यांनी केला आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. विनायक राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आता अक्कल दाढ आली आहे का? आता त्यांना कळाले का? २९ वर्षानंतर त्यांना कळालं? अख्ख्या देशाला माहिती आहे. ज्यावेळी बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा भाजपचे सर्व वरिष्ठ नेते शेपटी घालून पळत होते. रडत होते ढसाढसा, त्यावेळी बाबरी मशिद पाडणाऱ्यांना खंबीर आधार बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता, असे राऊत म्हणाले आहेत.

बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता नव्हता

बाबरी पाडली तेव्हा महाराष्ट्रातील कोणता नेता गेला होता. शिवसेनेचे एकाही नेते तिथे हजर नव्हता. बाबरीचा तो ढाचा पडला तेव्हा ३२ आरोपी होते. या ३२ आरोपीमध्ये महाराष्ट्रातील कोणताच नेता पाहायला मिळत नाही. तीस वर्ष खटले लढणारे नेते होते. आम्ही ते प्रसिद्ध केले नाही. ज्यावेळी संपूर्ण ढाचा पडला तेव्हा सगळ्यांनी निर्णय घेतला कोणी म्हणजे भाजपने पाडले कोणी पाडले ह्याने पाडले एक बैठक झाली तेव्हा ठरलं की, कोणीही श्रेय घ्यायचे नाही. राम सेवकाने हे काम केले आहे. कारसेवकाने केलं आहे. म्हणून कोणी विचारले तर ढाचा पाडणारा कारसेवक होता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे.


हेही वाचा : जेलमध्ये नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल

First Published on: May 2, 2022 5:11 AM
Exit mobile version