पुण्यात कोरोना रूग्ण संख्या वेगाने वाढतेय, धक्कादायक आकडेवारी आली समोर!

पुण्यात कोरोना रूग्ण संख्या वेगाने वाढतेय, धक्कादायक आकडेवारी आली समोर!

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसभरात नव्याने ६२० रुग्ण आढळल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १२, ४७४ एवढी झाली आहे. तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आज अखेर ५१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

१७१ रूग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आज अखेर ७, ४३५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

पिंपरी – चिंचवडमध्येही चिंता वाढतेय

तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत  नव्याने ९८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,७६८ वर पोहचली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीत पुन्हा एकदा नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. तसेच सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील प्रवेश टाळण्याची विनंती केली गेलीय. ३० जूनपर्यंत हा निर्णय घेण्यात आलाय. एक नगरसेविका, प्रभाग कार्यलयातील कर्मचारी आणि पालिका परिसरातील बँक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना प्रादुर्भाव पालिका इमारतीत वाढू नये आणि तसेच कर्मचाऱ्यांना केवळ कोरोनाच्या अनुषंगानेच अधिकचं काम करता यावं म्हणून पालिका आयुक्तानी हे पाऊल उचललं आहे.


हे ही वाचा – आता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार पालक!


 

First Published on: June 22, 2020 7:49 AM
Exit mobile version