MMRDA आणि अदानीमध्ये महत्त्वपूर्ण करार, मेट्रोच्या ‘या’ मार्गांसाठी करणार वीजपुरवठा

MMRDA आणि अदानीमध्ये महत्त्वपूर्ण करार, मेट्रोच्या ‘या’ मार्गांसाठी करणार वीजपुरवठा

मुंबई – मुंबई मेट्रोला आता अदानी समूहाकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) यांच्यात करार झाला आहे. या करारानुसार, दहिसर ते डीएन नगरदरम्यान धावणारी मेट्रो लाईन २ए आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वदरम्यान धावणारी मेट्रो ७ मार्गावर अदानी समूहाकडून वीजपुरवठा केला जाणार आहे.

हेही वाचा – ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयाला हायकोर्टाचा स्टे

मुंबईत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट (BEST) आणि राज्य वीज वितरण उपक्रम म्हणजेच महावितरण (MSEDCL) आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) या तीन कंपन्या प्रामुख्याने वीज पुरवठा करतात. अदानी समूहाकडून मुंबई उपनगरातील जवळपास ३१ लाखांहून अधिक घरांना आणि व्यावसायिकांना वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे आता मेट्रोसोबत करार करण्यात आला आहे.

दहिसर ते डीएन नगरदरम्यान धावणारी मेट्रो लाईन २ए आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्वदरम्यान धावणारी मेट्रो ७ मार्गावर अदानी समूहाकडून वीजपुरवठा केला जाणार असून यासाठी दरवर्षी १२ कोटी युनिटपेक्षा अधिक वीज वापरली जाणार आहे.

हेही वाचा – ‘मुंबईत कलम 144 लागू’ ही चुकीची माहिती, विश्वास नांगरे पाटलांचा खुलासा

‘गेल्या काही वर्षांपासून अदानी इलेक्ट्रिसिटीकडून विविध विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालये, मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांना वीजपुरवठा केला जात आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीकडून समर्थित स्पर्धात्मक दरांमध्ये विश्वासार्ह आणि शाश्वत वीज पुरवठा व ग्राहक-केंद्रित सेवा दिली जात आहे,’ असं अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.

First Published on: December 4, 2022 2:01 PM
Exit mobile version