Sindhudurg : सिंधुदुर्गात तब्बल 89 गावठी जिवंत बॉम्ब जप्त

Sindhudurg : सिंधुदुर्गात तब्बल 89 गावठी जिवंत बॉम्ब जप्त

Sindhudurg : सिंधुदुर्गात तब्बल 89 गावठी जिवंत बॉम्ब जप्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 89 गावठी जिवंत बॉम्ब सापडलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा सटमटवाडी याठिकाणी हे बॉम्ब आढळून आहेत. याप्रकरणी बांदा सटमटवाडीतील रहिवासी सादिर अन्वर खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलेय. हस्तगत केलेल्या गावठी बॉम्बची किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई बांदा पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केलीय.

या कारवाईत तब्बल 89 गावठी बॉम्बसह दोन बंदुकीच्या नळ्या, चार काडतुसे असा शिकारीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलाय. मिळालेल्या गावठी बॉम्बची किंमत अंदाजे तीस हजार इतकी आहे. दरम्यान, या सर्व गोष्टी आपल्याजवळ बाळगणाऱ्या सादिक खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बागाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र घाग, सचिन शेळके, अवधुत बनकर, अमित गोते, प्रवीण वालावलकर आणि बांदा पोलीस आदींच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या अगोदरही गावठी बॉम्बच्या स्फोटात परप्रांतीय मजूर जखमी झाले होते. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.


हे ही वाचा – Delhi Shahdara Gang Rape : महिलेसह लहान मुलांकडूनही बलात्कार पीडितेला बेदम मारहाण, क्रूरतेचा कळस गाठणारा नवा व्हिडीओ


 

First Published on: January 31, 2022 11:01 AM
Exit mobile version