दोषसिद्धीत सिंधुदुर्गने मारली बाजी; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

दोषसिद्धीत सिंधुदुर्गने मारली बाजी; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

सिंधुदुर्गः दोषसिद्धीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी बुधवारी दिली.
कामाच्या मूल्यांकनाचे निकष. सकारात्मक, नकारात्मक मापदंड (Parameters) इत्यादींच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामधून जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीतील दाखल गुन्हयांची माहिती विचारात घेऊन वार्षिक गुन्हेगारीच्या आधारावर अ-श्रेणी, ब- श्रेणी, क श्रेणी तयार करण्यात आली होती.

तीन वेगवेगळया श्रेणीतील सर्वोकृष्ट पोलीस घटक निवडीसाठी अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने सत्र न्यायलयात चालणाऱ्या खटल्यांच्या दोषसिध्दीत सिंधुदुर्ग पोलीस दलास राज्यात प्रथम क्रमांक दिला आहे.

भविष्यातही सत्र न्यायालय व प्रथमवर्ग न्यायालयामध्ये चालणाऱ्या खटल्यांचे पृथक्करण व न्यायालयात  नियमित चालणारे खटले यांचेही पर्यवेक्षण करण्याकरीता TMC (Trial Monitoring Cell) ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी व दोन पोलीस अंमलदार यांची नियुक्ती केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांच्या दोषसिद्धीसाठी योगदान दिलेल्या सर्व सरकारी अभियोक्ता, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, तपासिक अधिकारी, पैरवी अधिकारी यांचे अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी अभिनंदन केले.
राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी, अंमलदार यांना प्रोत्साहित करणे इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी सन २०२१ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामधून सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

First Published on: January 4, 2023 11:17 PM
Exit mobile version