परभणीत शिक्षकांनीच तयार केली कॉपी; पोलिसांनी केली अटक

परभणीत शिक्षकांनीच तयार केली कॉपी; पोलिसांनी केली अटक

 

परभणीः बारावी इंग्रजीचा पेपर फोडणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविऱोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले, या शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना अटक झालेली आहे. या सर्वांवर बारावीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार केल्याचा आरोप आहे. महत्त्वाचे म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारने कॉपी मुक्त परीक्षा अभियान राबवले होते. त्यासाठी जनजागृतीही केली होती. एवढं करूनही पहिल्याच दिवशी कॉपी सापडल्याने कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

मंगळवारी बारावीची परीक्षा सुरु झाली. परभणीच्या सोनपेठ शहरालगत असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचा इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर दिल्यानंतर काही शिक्षकांनी तो what’s app वर इतर शिक्षकांना पाठवला. धक्कादायकबाब म्हणजे त्या शिक्षकांनी विद्यार्थांसाठी कॉपी तयार केली. ही माहिती समोर येताच पोलिसांनी त्या शिक्षकांवर धाड टाकली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीतून कॉपीचे सत्य समोर आले. त्यानंतर सहा शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ, शिक्षक मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५,७,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत मंगळवारी बारावीची परीक्षा सुरु झाली. पहिल्याच पेपरला परीक्षा मंडळाचा गोंधळ समोर आला. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले. तसेच, या चुकांबाबत इंग्रजी विषयाच्या शिक्षकांमध्ये पेपर संपल्यानंतर चर्चा रंगली आहे. या चर्चेनुसार, इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक A3, A4, आणि A5 या क्रंमाकांचे प्रश्न न विचारता थेट उत्तरं देण्यात आली होती. प्रश्न कमांक तीनमध्ये A3 व A5 या क्रमाकांचे प्रश्न न विचारता परिक्षकाला ज्या सुचना नमुना उत्तरपत्रिकेत दिलेल्या असतात. त्या सुचना कृतिपत्रिकेत दिल्या असल्याची माहिती समोर आली. तसेच, A4 चा प्रश्न अलंकार ओळखा आणि दिलेली ओळ लेखन नियमानुसार लिहा असे न विचारता थेट उत्तर कृतिपत्रिकेत दिले होतो. ही चूक मंडळानेही मान्य केली. या चुकीचे गुण विद्यार्थ्यांना द्यावे की नाही यावर आता संभ्रम निर्माण झाला आहे.

First Published on: February 22, 2023 12:31 PM
Exit mobile version