स्मृती इराणींच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, त्यांनी दिले ‘हे’ उत्तर

स्मृती इराणींच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, त्यांनी दिले ‘हे’ उत्तर

Smriti Irani responds to the NCP agitation

इंधन दरवाढीच्या आणि महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या दौऱ्यावेळी आंदोलन केले. हे आंदोलन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसण्याचा पर्यत्न केला. परिसरात सृती इराणींच्या विरोधात जोरदा घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान या आंदोलनाला केंद्री मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर दिले.

स्मृती इराणींचे उत्तर –

2014 साली ज्या परिसराला लोक काँग्रेस कुटुंबाचा मजबूत किल्ला म्हणून ओळखायचे होते. तीथे जाऊ मी निडणूक लढवली आहे. 2019 साली आमेठीत भाजप आशा पद्धतीने निवडणूक लढली की काँग्रेसच्या अध्यक्षांना आपली सीट सोडून दूसरीकडून निवडणूकीला उभारावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्षाने माझ्यावर नाराज असने स्वभावीक आहे. राष्ट्रवादी पक्ष सुद्धा काँग्रेस पक्षातून उत्पन्न झाला आहे. त्यामुळे माझ्या प्रती त्यांचे आक्रमाक असने स्वभावीक आहे. मी इतकेच सांगेन की आम्ही भाजपच्या संघटने कौशल्यातून काँग्रेसच्या अध्यक्षांना पहिल्यांदा निवडणूकीत हरवले आहे. त्याचा परिनाम ते भोगत आहेत आणि पुढे ही भोगतील. काँग्रेसला याचे सदैव दुख: राहील की भाजपच्या साधारण कार्यकर्त्यांने त्यांच्या अध्यक्षांना हारवले, असे स्मृती इरानी म्हणाल्या.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात महागाईविरोधात स्मृती इराणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होत्या. त्यानी त्याकाळच्या युपीए सरकारला बांगड्यांचा आहेर पाठवला होता. आता मोदी सरकारमध्ये स्मृती इरानी मंत्री आहेत. अशावेळी इराणी गप्प का?, असा प्रश्न राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून विचारण्यात आला. यावेळी महिला कार्यक्त्यांनी स्मृती इराणींना मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे. त्यांना बांगड्यांचा आहे द्यायचा आहे, अशी मागमी करत स्मृती इराणी थांबलेल्या हॉटेलमध्ये घूसन्याचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरणी –

स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. त्यासाठी स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून इराणी थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले.

First Published on: May 16, 2022 7:01 PM
Exit mobile version