छत्रपतींच्या नावे खंडणी, मुलींसोबत अनैतिक संबंध; शिवभक्त अक्षय बोऱ्हाडेवर पत्नीचे गंभीर आरोप

छत्रपतींच्या नावे खंडणी, मुलींसोबत अनैतिक संबंध; शिवभक्त अक्षय बोऱ्हाडेवर पत्नीचे गंभीर आरोप

छत्रपतींच्या नावे खंडणी, मुलींसोबत अनैतिक संबंध; शिवभक्त अक्षय बोऱ्हाडेवर पत्नीचे गंभीर आरोप

जुन्नरचे माजी नगरसेवक आणि शहा गॅस वितरक रुपेश शहा यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरणं ताजे असतानाच आता अक्षय बोऱ्हाडेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे खंडणी वसुली करत अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचे गंभीर आरोप त्याच्या पत्नीने केले आहे.

राज्यातील बेवारस, बेघर, गरीब वेडसर लोकांना तो घरी आणत तो शिवऋण संस्थेच्या माध्यमातून सांभाळ करायला, तसेच फेसबुक LIVE करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे आर्थिक मदत गोळा करायचा. मात्र जुन्नर पोलिसांनी त्याच्यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून २ दिवसांपूर्वी त्याला अटक केली.

अक्षय बोऱ्हाडेच्या पत्नीचे आरोप

अक्षय बोऱ्हाडेची पत्नी रुपाली बोऱ्हाडे हिने देखील पतीविरोधात मारहाण, मानसिक छळ, कौंटुंबिक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अक्षयच्या पत्नीने पती अक्षय बोऱ्हाडे, सासू सविता बोऱ्हाडे आणि दीर अनिकेत बोऱ्हाडविरोधात प्रचंड धळ केल्याचे आरोप केले आहेत. या सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्रास दिला तसेच वेळोवेळी रिव्हॉलवरची वा गुंडांची धमकी देत शारीरिक आणि मानसिक छळ केला. याशिवाय स्वत: कोणतेही काम न करता शिवऋण प्रतिष्ठान संस्थेतून आलेल्या निधीचा वापर स्वत:च्या चैनीसाठी केला. तसेच अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवत फसवणूक केल्याची आरोप त्याच्या पत्नीने तक्रारीत केले आहेत. रुपाली बोऱ्हाडे हीने पती अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार या सर्वांविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे,

अक्षय बोऱ्हाडेविरोधात जु्न्नर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी जुन्नरचे माजी नगरसेवक रुपेश शहा यांना माहिती अधिकारात अर्ज दाखल करतो असे सांगत अक्षय बोऱ्हाडे याने खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली. दरम्यान अक्षयला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
मात्र याप्रकरणानंतर पत्नीनेही गुन्हा दाखल केल्याने अक्षयचे सामाजिक कार्यमागील काळे धंदे समोर आले आहेत. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढली आहे.


बोईसर MIDC मधील जखारिया कंपनीत भीषण स्फोट, एका कामगाराचा मृत्य, ४ गंभीर जखमी


 

First Published on: September 4, 2021 9:36 AM
Exit mobile version