दोन एकर शेतीत गांजा लावण्यास परवानगी मिळणेबाबत

दोन एकर शेतीत गांजा लावण्यास परवानगी मिळणेबाबत

कोणतेही पिक घेतले तरीही शासनाचा हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतीही तोट्यात करावी लागत आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करत कठीण झाल आहे. त्यामुळेच दोन एकर क्षेत्रात गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी असे पत्र सोलापूरच्या एका शेतकऱ्याने लिहिले आहे. शेतकऱ्याने जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र लिहित अशा प्रकारची विचित्र मागणी केली आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मला प्रशासनाने लेखी परवानगी द्यावी, अन्यथा मी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहित धरून लागवड सुरू करणार आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असेही या शेतकऱ्याने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील शेतकऱ्याने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिले आहे. सोलापूरमध्ये दोन एकर इतकी जागा शेतकऱ्याची आहे. या दोन एकरच्या जागेत गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी ही विनंती सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना मागितली आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना मशागतीचा खर्चही मिळत नाही. तसेच ऊस साखर कारखान्याला दिल्यावर त्याठिकाणीही बिल मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून माझ्या शेतात गांजा लागवड करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शेतकऱ्याने अर्ज केला आहे.

येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मला गांजा लावडीसाठी परवानगी द्यावी. अन्यथा मी १६ सप्टेंबरपासून आपल्याकडून परवानगी मिळाली असे गृहित धरून गांजा लागवड सुरू करेन असे शेतकऱ्याने स्पष्ट केले आहे. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असेही शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

शेतकऱ्याने शेतमालाला न मिळणाऱ्या हमीभावाचा प्रश्न या पत्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे. शेतमालाला शासनाकडून हमीभाव दिला जात नसल्याने शेतकऱ्याने आपली व्यथा या माध्यमातून मांडली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी सरकारकडून मिळणारा आधार तुटला असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. शेतकऱ्याकडून गांजाची शेती करण्याचे टोकाचे पाऊल यानिमित्ताने उचलण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ऊस लागवडीचाही प्रश्न यानिमित्ताने मांडण्यात आला आहे.


हे ही वाचा – अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना मोदी, शहांचा फोन


 

First Published on: August 26, 2021 12:42 PM
Exit mobile version