लोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान

मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. १३ राज्यातील ९७ लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान होणार आहे. राज्यातील सर्व मतदारसंघामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.  महाराष्ट्रातील १० मतदारसंघात १७९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये आज बंद होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंद अडसूळ, भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे या दिग्गज उमेदवारांसह १७९ उमेदवारांचे आज राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

लोकसभा निवडणुक २०१९ : दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१. १२ टक्के मतदान

राज्यात ५ पर्यंत सरासरी ५७ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी –

नांदेड – ६० टक्के

परभणी – ५५ टक्के

सोलापूर – ५० टक्के

अमरावती – ५३ टक्के

बुलढाणा – ५१ टक्के

लातूर – ५८ टक्के

बीड – ६४ टक्के

हिंगोली – ५५ टक्के

उस्मानाबाद – ५८ टक्के

अकोला – ५४ टक्के

A view of the sea
Pradnya Ghogale

परभणी, लातूर, नांदेड आणि सोलापूर येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावांचा विकास न झाल्याने गावकरी नाराज झाले असल्यामुळे त्यांनी यंदाच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावात गावकऱ्यांनी बहिष्काराचे फलक लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Pradnya Ghogale

प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथे मतदानाचा हक्क बजावला

First Published on: April 18, 2019 8:07 AM
Exit mobile version