महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा सोनिया गांधींकडून आढावा, बाळासाहेब थोरातांना दिल्या सूचना

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा सोनिया गांधींकडून आढावा, बाळासाहेब थोरातांना दिल्या सूचना

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा सोनिया गांधींकडून आढावा, बाळासाहेब थोरातांना दिल्या सूचना

राज्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात भयावह परिस्थिती झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्य वाढली असल्याने राज्यातील सर्व रुग्णालये पुर्ण क्षमतेने भरली आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा सोनिया गांधी यांनी केली. यावेळी कोरोना परिस्थितीबाबत सूचनाही थोरातांना सोनिया गांधींनी दिल्या आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि सरकारकडून होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेचे वेळेत लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना सोनिया गांधी यांनी केल्याची माहिती थोरात यांनी दिली.

राज्यातील कोरोना परिस्थितीत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कामाबाबत सोनिया गांधी यांनी समाधान व्यक्त केले. राज्य सरकार पारदर्शकपणे कोरोना परिस्थिती हाताळत असून सरकारने यापुढेही अधिक काळजी घ्यावी, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.

First Published on: April 27, 2021 7:49 PM
Exit mobile version