यंदा पावसात खरीप व उन्हाळी पिकांच्या पेरणीस मागील दोन वर्षांच्या तुलनेत वेग

यंदा पावसात खरीप व उन्हाळी पिकांच्या पेरणीस मागील दोन वर्षांच्या तुलनेत वेग

यंदा पावसात खरीप व उन्हाळी पिकांच्या पेरणीस मागील दोन वर्षांच्या तुलनेत वेग

यंदा पावसाचा मोसम बळीराजाला सुखावून गेला आहे. यंदा मान्सूनची राज्यात हजेरी लागताच त्याने धुमाकूळ घातला होता. यंदाच्या पावसात खरीप व उन्हाळी पिकांच्या पेरणीस चांगलाच वेग आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पिकांच्या पेरणीस बळकटी मिळाली आहे. (Sowing of kharif and summer crops in rainy season this year is faster than last two years) अशाच प्रकारे शेतीची वाढ सुरु राहिली तर अर्थव्यवस्थेतील चिंतेचा विषय असेलेली महागाई रोखण्यास मदत होईल. पावसाच्या सुरुवातीलाच दक्षिण,मध्य आणि पश्चिम आणि उत्तर राज्यांमध्ये तांदूळ,कापूस,सोयाबीन,मका आणि डाळी या पिकांच्या पेरणीस मोठी गती मिळाल्याचे अधिकांऱ्यांनी सांगितले आहे. उन्हाळी पिकांची लागवड मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ३८ टक्क्यांहून अधिक आहे. यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा देशात दोन तृतीयांश भाग व्यापून टाकल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

यंदा उत्तर आणि पश्चिम राज्यांमध्येही पावसाची व्यवस्था योग्य प्रकारे सुरु आहे. याभागात सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली. पाऊस चांगला झाल्याने उत्पन्न देखील चांगले होत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यांनी सादर केलेल्या साप्ताहिक पेरणीच्या आकडेवारीनुसार यंदा उन्हाळी पिकांची लागवड मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ३८ टक्क्याहून अधिक आहे. तर २०१९मध्ये हे प्रमाण २ टक्के इतके होते.

भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेती उत्पादन हे भारतीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. भारतात शेतीसाठी पेरलेल्या ५० टक्के क्षेत्रात सिंचनाची कमतरता आहे. बऱ्याच राज्यातील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसात चांगला पाऊस झाल्याने लवकर पेरणी सुरु केल्याचे विश्लेषकांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात क्रूड तेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्याचप्रमाणे जीडीपी वाढ आणि वाढत्या किंमतीमुळे कोरोना महामारीत त्याचा जोरदार फटका बसला.

आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ३.१ टक्क्यांनी शेतीची वाढ तर आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४.५ टक्के वाढ झाली. तर देशाच्या अन्नधान्य उत्पादन २०१२ ते २१ मध्ये २.५ टक्क्यानी वाढून ३०५.४३ टक्क्यांवर आला. कर्नाटक,तमिळनाडू आणि केरळ राज्यात तांदुळाची लागवड आतापर्यंत १०० टक्क्यांनी वाढली आगे. त्याचप्रमाणे डाळींच्या पेरणीचा जोरही वाढलेला आहे.


हेही वाचा – एन्काउंटवर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर NIAचा छापा

 

First Published on: June 17, 2021 9:50 AM
Exit mobile version