पुण्यात १६ वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार करून खून; आरोपीला अटक

पुण्यात १६ वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार करून खून; आरोपीला अटक

एका १६ वर्षीय मुलाचा खुन झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोथरूड येथील एकलव्य कॉलेजच्या मैदानात पोत्यात या मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेतची माहिती मिळताच या मुलाच्या खुनाप्रकरणी एका आरोपीला कोथरूड पोलिसानी अटक केली आहे.

करण गोपाळ राठोड (१६) असं खून झालेल्या विशेष मुलाचे नाव आहे. या मुलाच्या खुनाच्या आरोपाखाली कोथरूड पोलिसांनी पिटू गौतम (२१) या आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील एकलव्य कॉलेजच्या मैदानावर शुक्रवारी रात्री मुले खेळत होती. त्यावेळी एका पोत्यात अंगावर कपडे नसलेल्या मुलाचा मृतदेह आढळून आला. यावेळी मैदानात उपस्थितांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी भागातील करण गोपाळ राठोड याचा खून झाल्याचं समोर आलं. दरम्यान, करणच्या पालकांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार काही दिवसांपूर्वीच पोलिसांना दिली होती. मात्र याप्रकरणी अधिक तपास करत असताना पोलिसांनी काही तासातच आरोपी पिटु गौतम याला अटक केली.

पोलिसांनी अटक केल्यावर आरोपी पिंटून खुनाची कबुली दिली. आपणच करणवर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केल्याची आणि त्याचा मृतदेह पोत्यात भरुन टाकल्याची कबुली आरोपीने दिली आहे.


हेही वाचा – सुपर मार्केटला वाईन विक्रीची सक्ती नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

First Published on: March 25, 2022 7:23 PM
Exit mobile version