ST Worker Strike: निलंबनाचा आदेश मिळाल्यावर ST कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, प्रवीण दरेकरांची विधान परिषदेत माहिती

ST Worker Strike: निलंबनाचा आदेश मिळाल्यावर ST कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, प्रवीण दरेकरांची विधान परिषदेत माहिती

ओमिक्रॉनच्या नावावर अधिकृत गोष्टी बंद करुन अनधिकृतपणे लूट करण्याचा डाव, दरेकरांचा ठाकरे सरकारवर आरोप

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीवर कर्मचारी ठाम असून अद्यापही कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राज्यातील संप सुरुच ठेवला आहे. एसटी महामंडाळाने पगारवाढ केल्यानंतरही कर्मचारी कामावर परत येत नसल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची, सेवा समाप्ती आणि बडतर्फाची कारवाई सुरु करण्यात आली आहे. राजापुरमधील एसटी कर्मचाऱ्याला निलंबनाचा आदेश मिळाल्यावर तो तणावाखाली आला आणि नंतर त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. दरेकर म्हणाले की, एसटी संपात सहभागी झाल्यामुळे राकेश भारतीय नावाच्या ३५ वर्षीय युवक राजापुर आगारात कार्यरत होता. त्याला एसटी संपात सहभागी असल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा आदेश मिळाल्यावर या कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. राजापुर आगारातील २० ते २५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षापासून चालक व वाहक अशी दोन्ही कामे सांभाळत होता.

बुधवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु रात्री १०.३० च्या दरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात सव्वा वर्ष आणि चार वर्षाचा मुलगा आहे. कुटुंबाने पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. पण पोलीस एफआयआर दाखल करुन घ्यायला पाहिजे होते. एसटी कर्मचारी रोज एफआयआर करत आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या नोटींसांमुळे भीती निर्माण झाली आहे. रोज कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे राज्य सरकारला कारवाई करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या मागणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचं निलंबन, एकनाथ शिंदेंचा निर्णय

First Published on: December 23, 2021 4:31 PM
Exit mobile version