घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांच्या मागणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचं निलंबन, एकनाथ शिंदेंचा निर्णय

देवेंद्र फडणवीसांच्या मागणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याचं निलंबन, एकनाथ शिंदेंचा निर्णय

Subscribe

भांडुपच्या महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये एनआयसीयूमध्ये चार बालकांचा मृत्यू झाला होता. ११ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलमध्ये वातानुकुलित यंत्र होतं. ते यंत्र बिघडलं त्यामुळे शॉर्टसर्किट झाला आणि तीन दिवस यांसंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे २० ते २२ डिसेंबर रोजी तीन बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच आज चौथ्या बालकाचा मृत्यू झालाय. बालकांच्या मृत्यूकरीता जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पाहीजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

बालकांच्या मृत्यूकरीता जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पाहीजे. तसेच याबाबत चर्चा करण्यात आली पाहीजे, अशी प्रकारची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. परंतु फडणवीसांनी या मुद्द्यावर जोर धरल्यामुळे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याचं (MOH) निलंबन केलं असून त्यावर चौकशी करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बालकांच्या मृत्यूबाबत सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेमध्ये ५० हजार रूपयांच्या ठेवी आहेत. मुंबई महापालिकेची आरोग्य व्यवस्था चांगली आहे, असं सांगितलं जातं. कधी नायर हॉस्पीटलमध्ये मृ्त्यू होतात. तर कधी बालकांचा मृ्त्यू सावित्रीबाई फुले या ठिकाणी होतो. हे अतिशय गंभीर आहे. दोन तासांपूर्वी चौथं बालक गेलं. अशा प्रकारची चूक जर येथे होत असेल तर आरोग्य विभाग ज्यांच्याकडे आहे. त्यांनाही निलंबित करण्यात यावं. अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं

बालकांच्या मृत्यूकरीता जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पाहीजे. तसेच याबाबत चर्चा करण्यात आली पाहीजे, अशी आमची मागणी आहे. मुलुंडला सुद्धा एक घटना घडली होती. आज सभागृह सुरू असताना सुद्धा एका बालकाचा मृत्यू झाला. यावर चर्चा करायची नाहीतर कोणत्या गोष्टींच्या बाबतीत चर्चा करायची. यावर कारवाई होत नसेल तर हे कसं चालेल, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

- Advertisement -

सर्व कामकाज थांबवून यासंबंधीत निर्णय घेतला पाहीजे. बालकांच्या मृत्यूवर आणि अशा प्रकारच्या मृत्यूवर यापूर्वी देखील अनेक प्रकारचे स्थगन प्रस्ताव आले. अनेकवेळा चर्चा झाली आणि चर्चा झाली. तसेच काहींवर कारवाई देखील झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना धमकी देण्याचं सत्र सुरू – सुधीर मुनगंटीवार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -