सारथी संस्थेस खारघरमधील भूखंड देण्यास मान्यता, नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन, राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा

सारथी संस्थेस खारघरमधील भूखंड देण्यास मान्यता, नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन, राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा

सारथी संस्थेस खारघरमधील भूखंड देण्यास मान्यता, नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन, राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच राज्यात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित ठिकाणी ७ जागांवर छापेमारी झाली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात पोहचण्यापूर्वीच मंत्रालयातील बत्तीगूल झाली होती. दुसऱ्यांदा मंत्रालयातील वीज गेली होती. आजच्या बैठकीमध्ये सारथी संस्थेला खारघरमधील भूखंड देण्यास मान्यता दिली आहे. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन आले असल्यामुळे खरेदी कालावधी २८ जूनपर्यंत वाढवण्याची केंद्र सरकारला विनंती करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात पार पडली आहे. या बैठकीदरम्यान नगर विकास विभागामध्ये सारथी संस्थेस खारघर येथील भूखंड देण्याचा निर्णय दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून राज्यातील जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केलं आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची टंचाई आहे. यामुळे अशा भागात टॅकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत ४०१ टँकर्सने पुरवठा करण्यात येत आहे. तसेच धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा आहे. हरभरा उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे खरेदी कालावधी २८ जूनपर्यंत वाढविण्याची केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळापूर्वी वीज पुरवठा खंडित

मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार होती. पंरतु बैठकीपुर्वीच वीज पुरवठा खंडित झाला होता. यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा मंत्रालयात दाखल झाले होते. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला होता. काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना लाईट गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील वेळी व्हिसीद्वारे बैठकीला उपस्थित राहिले होते. वीज खंडित झाल्यामुळे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा संपर्क बैठकीदरम्यान तुटला होता.


हेही वाचा : संजय राऊत, संजय पवारांकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, मविआच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

First Published on: May 26, 2022 2:52 PM
Exit mobile version