MBBS उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरकार घेणार मदत – अमित देशमुख

MBBS उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सरकार घेणार मदत  – अमित देशमुख

राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. त्यामुळे आता एमबीबीएमसची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मदत सरकार या कोरोनाच्या संकटात घेणार आहे. तसेच १५ हजार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नर्सला देखील या संकट काळात कामावर रुजू करणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

अमित देशमुख म्हणाले की, ‘जे एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडतील, असे काही साडे पाच ते सहा हजार डॉक्टर्स राज्यात उपलब्ध होतील आणि त्यांना कोरोना काळात या कामासाठी उपयोगात आणता येईल. या सगळ्या आपत्तीमध्ये ही एक चांगली बाब आहे. त्याबरोबर साडे १५ हजार नर्स यांनी देखील परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यांची नोंदणी तातडीने करा, अशी आम्ही सूचना दिली आहे. राज्यात जिथे मनुष्यबळ अवश्य असले तिथे ते उपलब्ध करू द्या.’

‘दरम्यान डॉक्टर इंटर्नशिपसाठी रूजू होतील. ते कंत्राटी पद्धतीने नाही आहेत. त्यांच्या तो शिक्षणाचा भाग आहे. खासगी क्षेत्रात ज्यांनी नर्स कायमस्वरुपी हव्या आहेत, त्यांना कायमस्वरुपी घेता येईल. सरकार क्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने घ्यावे लागेल. कारण नर्सला सरकार नोकरीत सामील करू घेण्या संदर्भात काही नियामावली आहे. त्यामुळे सध्या राज्यात २० हजार आरोग्य कर्मचारी उपलब्ध होतील,’ अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.


हेही वाचा – महाराष्ट्राच्या १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठीही तामिळनाडू पॅटर्न?


 

First Published on: April 12, 2021 7:08 PM
Exit mobile version