दहीहंडी उभारण्यास मनाई, सार्वजनिक कार्यक्रम टाळा, राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

दहीहंडी उभारण्यास मनाई, सार्वजनिक कार्यक्रम टाळा, राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

दहीहंडी उभारण्यास मनाई, सार्वजनिक कार्यक्रम टाळा, राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

राज्यातील कोरोनाप्रादुर्भावाचा विचार करता राज्य सरकारकडून पुन्हा खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहीहींडी उभारण्यास राज्य सरकारने मनाई केली असून घरगुती पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. जन्माष्टमी गोपाळकाला साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. मात्र कोरोना अजून संपला नसल्यामुळे सणासुदीच्या काळात गर्दी करुन चालणार नाही. गर्दी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळेच राज्य सरकारडून सणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारने निर्बंध लादले असले तरीही दहीहंडी उत्सव करणार अशी आक्रमक भूमिका भाजप आणि मनसेने घेतली आहे.

राज्य सरकारने जन्मष्टमीसाठी नियमावली जारी केली आहे. यामध्ये दहीहंडी उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम पूजा टाळाव्या त्याऐवजी घरगुती पद्धतीने सण साजरा करावा असे नियमावलीत म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुर्वीही कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सण साजरे करताना दहीहंडी उत्सवातही संय राखूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दहीहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा. गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारे दहीहंडी एकत्रित येऊन साजरी करु नये. दहीहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येऊन कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्याएवजी रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबवण्यात यावेत.

दहीहंडी उत्सवातही संयम राखूया

भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य व कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमीनंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम राखूया. कृष्णाला सखा सर्वोत्तम मानले जाते. ते सर्व प्राणिमात्रांची आणि जीवलगांची काळजी वाहतात. त्यांना नमन करताना आपणही सर्वांची काळजी घेऊया. घरात राहूनच आरोग्यदायी हंडीची लयलूट करूया. दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचा सांगून त्याला दुजोरा दिला आहे. आज आपण जनतेच्या जीवाला जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे यातून अधोरेखित होते आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे आहे तसेच राज्य शासन वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल ते जनतेच्या हिताचेच असल्याने राजकीय, सामाजिक, आणि सर्व थरांतील लोकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन परत एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.


हेही वाचा :  श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला होता? एका शापामुळे उध्वस्त झाला यदुवंश


 

First Published on: August 30, 2021 9:51 PM
Exit mobile version