घरसणवारश्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला होता? एका शापामुळे उध्वस्त झाला यदुवंश

श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला होता? एका शापामुळे उध्वस्त झाला यदुवंश

Subscribe

श्रीकृष्णाच्या लीला माहित नाहीत असा कोणीही पृथ्वीतलावर शोधूनही सापडणार नाही. कारण कृष्ण मानव रुपात जरी जन्माला आला होता तरी त्याच्या लिला या दैवीशक्तीनेच प्रेरित होत्या. पण मृत्यू या चक्रपाणी कृष्णालाही चुकला नाही.

मानवता आणि समस्त मानव जातीला जवळजवळ नष्ट करणार कुरुक्षेत्रातल युद्ध शांत झालं होतं. पण त्या विजयाने पांडवांना आनंदापेक्षा दुख:च अधिक दिलं. युद्धात आपलीच माणसं गमावल्याने पांडवाचे मन विचलित झाले होते.

- Advertisement -

पांडवाचं ते दुख बघून कृष्णही दुखी झाले होते. यामुळे यु्ध्दानंतर श्रीकृष्ण पांडवाबरोबर गांधारी आणि धृतराष्ट्राच्या भेटीस गेले. दुर्योधनच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्याबरोबरच क्षमा मागण्यासाठी ते गेले. तेथे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले धृतराष्ट्राच पार्थिव आणि त्याच्या अंध आई वडिलांना बघून पांडवाना तीव्र दुख झाले. गांधारीने पांडवाना नाही तर दुर्योधनाच्या मृत्यूसाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवलं.

- Advertisement -

तू व्दारकाधीक्ष आहेस. विष्णूचा अवतार म्हणून मी तुझी पूजा करत होते. तू तुझ्या दिव्य शक्तींनी हे युद्ध टाळू शकला असतास. पण तू तसं जाणीवपूर्वक केलं नाहीस. मुलाच्या मृत्यूवर शोक करणाऱ्या मातेचे काळीज तुला कधीच कळणार नाही. पण तू तूझ्या मातेला देवकीला जाऊन विचार जिने डोळ्यासमोर आपल्या सात मुलांचा मृत्यू पाहीला आहे.

एवढे बोलून झाल्यावर गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला. जर भगवान विष्णूची मी खरी भक्त असेल तर आजपासून ३६ वर्षांनंतर तू देखील या पृथ्वीतलावर जिवंत नसशील. द्वारकेचा नाश होईल. यादव वंशातील प्रत्येकजण एकमेकांच्या जीवावर उठेल.

एवढे बोलून झाल्यानंतर गांधारी श्रीकृष्णाच्या चरणावर पडून रडू लागली. कृष्णाने तिला उठवले आणि म्हणाला माते तूझा हा शाप खरा होणार. पण यामागे फक्त तुझी माझ्यावरील खरी श्रद्धा नसेल तर त्यावेळी तशी परिस्थितीचं निर्माण होईल.

त्यानंतर कृष्णाच्या द्वारकेमध्ये अराजकता वाढली. यामुळे थोडा विसावा घेण्यासाठी एका विशाल झाडाखाली निवांत पडले होते. त्याचेवळी जरा नावाचा एक शिकारी हरणाच्या शोधात तिथे आला. कृष्णाचे हलणारे सुंदर पाऊल बघून त्याला ते झाडाखाली बसलेले हरण वाटले. त्याने विषारी बाण सोडला. तो बाण कृष्णाच्या थेट तळपायात घुसला. कृष्णाचा पाय रक्तबंबाळ झाला. आपण कृष्णावर बाण चालवल्याचे लक्षात आल्यावर शिकाऱ्याने त्यांची क्षमा मागितली. कृष्णानेही त्याला माफ केलं आणि प्राण सोडले. गांधारीचा शाप खरा ठरला.

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -