राज्य सरकार घेणार कुष्ठ रुग्णांचा शोध!

राज्य सरकार घेणार कुष्ठ रुग्णांचा शोध!

आरोग्य मत्री दीपक सावंत

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबरपासून ९ ऑक्टोबर २०१८ पर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांत आणि ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येत आहे. ७१ हजार २९७ शोधपथकांच्या सहाय्याने १४ दिवसांत जवळपास साडे आठ कोटी लोकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंत्रालयात दिली आहे. या अभियानाबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, ‘२०१७-१८ मध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण दर दहा हजारी ०.८० पेक्षा जास्त असलेल्या २२ जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली. प्रत्येक गावातील स्थानिक ‘आशा’ कार्यकर्ती आणि एक पुरुष स्वयंसेवक यांचे पथक तयार करून ४ कोटी ५९ लाख २९ हजार ६६१ लोकांची प्रत्यक्ष तपासणी केली गेली. त्यामध्ये १ लाख ६४ हजार ९६४ संशयित रुग्ण शोधण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

शोध मोहिमेसाठी ३५ जिल्ह्यांची निवड

२०१६ -१७ मध्ये १६ जिल्ह्यांमध्ये ही मोहिम राबवण्यात आली होती. त्यात, ४ हजार १३४ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. २०१५-१६ मध्येही पाच जिल्ह्यांत शोध मोहीम राबवून १६६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा प्रगती योजनेत समावेश केला आहे. त्या अनुषंगाने देशात विविध मोहिमा राबवून कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यावर्षी या मोहिमेंतर्गत ३५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

अशी राबवणार शोध मोहीम


हेही वाचा – आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना दे धक्का

First Published on: September 24, 2018 8:35 PM
Exit mobile version