सावत्र आई-सख्खा बापाचा चिमुकल्यांवर अत्याचार

सावत्र आई-सख्खा बापाचा चिमुकल्यांवर अत्याचार

सावत्र आई आणि सख्ख्या बापाने मुलांच्या पोटाला चटके दिल्याची धक्कादायक प्रकरण

सावत्र आई आणि सख्खा वडिलांकडून आपल्या दोन्ही मुलांना नरकयातना दिल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या दोन्ही मुलांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून यातना सहन करत आहेत. सावत्र आई आणि सख्खे वडील मुलाला लोखंडी सळईने पोटाला चटके देत होते, तर बेदम मारहाण देखील करायचे. रात्री वेदना असाह्य झाल्याने दोन्ही मुले घरातून पळून आली. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला असून आई आणि वडिलांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

मनीषा सूर्यवंशी आणि गुंडेराव सूर्यवंशी असे नराधम आई वडिलांचे नाव आहे. हे दोघेही गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मुलांना बेदम मारहाण करत पोटाला चटके द्यायचे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दोन्ही मुलांवर उपचार सुरु आहेत

दोन्ही मुले घरातील स्वच्छता का करत नाही? खाण्याची अथवा इतर कोणतीही वस्तू खिशात ठेवल्यास लाकडी दांडके, उलतान आणि लोखंडी सळईने सावत्र आणि सख्खे वडील हे मुलांना अमानुष मारहाण केली जात होती. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मुलाच्या पोटाला लोखंडी सळईने चटके दिले आहेत. हा प्रकार गेल्या गेल्या पाच ते सहा महिन्या पासून सुरू असून या नरक यातना दोन्ही मुले सहन करत आहेत. बुधवारी मात्र दोघांची सहनशीलता संपल्याने दोघेही घर सोडून निघाले होते. मात्र काही जागरुक नागरिकांनी शाळेच्या ड्रेसमध्ये असलेल्या मुलांना रात्री कुठे निघाल्याची चौकशी केली असता, त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत, सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांना जेरबंद केले आहे.

First Published on: December 13, 2018 11:59 AM
Exit mobile version