संतापजनक! जन्मदात्या आईनेच आवळा गोंडस मुलीचा गळा

संतापजनक! जन्मदात्या आईनेच आवळा गोंडस मुलीचा गळा

जन्मदात्या आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या गोंडस मुलीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील सिव्हिल रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच बाळावर उपचार केले मात्र, उपचारा दरम्यान बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमके काय घडले?

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सांगली येथील यलापूर येथे राहणाऱ्या सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (३०) पाच दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी सांगवलीतील सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, सुमित्राने ४१ तासांपूर्वीच मुलीचा गळा आवळला. दरम्यान, रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेने हा धक्कादायक प्रकार पाहिला. तिने याची माहिती वॉर्डमधील डॉक्टरांना दिली. त्यानंतर परिचारिकांनी उपचाराकरता बाळाला तिच्या हातातून घेतले आणि पाहिले असता नवजात बालिकेच्या गळ्यावर हाताचे व्रण आढळले.

दरम्यान, शनिवारी रात्री बालिकेचा गळा आवळल्याचा प्रकार लक्षात येताच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुमित्रा गंगाप्पा जुट्टी या आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत सुमित्रा या महिलेला विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी मध्यरात्री सुमित्रावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिची चौकशी सुरू आहे. तिने पोटच्या मुलीचा गळा का आवळला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


हेही वाचा – स्वतःच्याच रायफलमधून चुकून झाली फायरिंग; घाटकोपरमध्ये शिपायाचा मृत्यू


First Published on: October 19, 2020 1:08 PM
Exit mobile version