Student Agitation: विद्यार्थ्यांना चिथवणाऱ्या हिंदुस्तानी भाऊसह एकाला धारावी पोलिसांकडून अटक

Student Agitation: विद्यार्थ्यांना चिथवणाऱ्या हिंदुस्तानी भाऊसह एकाला धारावी पोलिसांकडून अटक

Student Agitation: विद्यार्थ्यांना चिथवणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांकडून अटक

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या यासाठी राज्यात काल, सोमवारी अचानक ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मुंबईसह नागपूर, अकोला, औरंगाबाद, पुणे आणि उस्माबानाबादमध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी बस वगैरे फोडून आपल्या आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अचानक दहावी, बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरण्यामागे बिग बॉस फेम विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊचा हात होता. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना चिथवणाऱ्या या हिंदुस्तानी भाऊसह एकाला धारावी पोलिसांनी गजाआड केले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भातील तारखा राज्य मंडळाने जाहीर केल्या होत्या. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे परीक्षा पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील असे जाहीर केले. पण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा हा निर्णय मान्य नव्हता. त्यांना ऑनलाईन परीक्षा पाहिजे होत्या. त्यामुळे विद्यार्थी काल या मागणीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हिंदुस्तानी भाऊने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळीच वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केले. पण आज याप्रकरणी हिंदुस्तानी भाऊला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदुस्तानी भाऊ विरोधात इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना चिथवल्यामुळे आयपीसीच्या अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दंगल, महाराष्ट्र पोलीस कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट या अंतर्गत हिंदुस्तानी भाऊ विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंदुस्तानी भाऊसोबत आणखीन एक आरोप इक्रार खान वखार खान अटक केली आहे. या आरोपी विरोधात कलम ३५३, ३३२, ४२७, १०९, ११४, १४३, १४५, १४६, १४९, १८८, २६९, २७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – धारावीत विद्यार्थ्यांचा उद्रेक!


 

First Published on: February 1, 2022 8:46 AM
Exit mobile version