आता आकर्षक पॅकिंग्जमधून मिळणार शालेय पोषण आहार

आता आकर्षक पॅकिंग्जमधून मिळणार शालेय पोषण आहार

एखाद्या मोठ्या ब्रँडला लाजवेल अशा आकर्षक पॅकिंग्जमध्ये सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार आहे. यात ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि सोयाबिन अशा वेगवेगळ्या पॅकेट्समधून हा पोषण आहार शाळांना पुरवला जाणार आहे. मात्र, खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांबाबत मात्र परिपत्रकात कोणताही उल्लेख नसल्याने त्यांच्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

बिस्किटच्या पुड्यासारख्या दिसणार्‍या पॅकिंग्जच्या स्वरुपात पोषण आहार दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ई-निविदा प्रक्रिया राबवून हा ठेका जालन्यातील दिव्या एस. आर. जे. फूड्स एलएपी कंपनीला देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचलनालयाच्या स्तरावर ही निविदा प्रक्रिया पार पाडली गेली. त्यानुसार या योजनेला पात्र शाळांमधील सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, शासकीय व कटकमंडळ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पात्र शाळांच्या पटसंख्येनुसार १ली ते ५वी आणि ६ वी ते ८वी अशी वेगवेगळी मागणी नोंदवण्याचे आवाहन कंपनीने केली आहे.

First Published on: October 8, 2021 11:05 PM
Exit mobile version