संघर्ष आता राष्ट्रवादीसोबत, शिवसेना अजून भाजपसोबतचं, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

संघर्ष आता राष्ट्रवादीसोबत, शिवसेना अजून भाजपसोबतचं, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

BJP leader Sudhir Mungantiwar said that this is not a Political Crisis this is support to Narendra Modi

राज्यातील गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता संघर्षात अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेविरोधात निकाल येताच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर आता भाजप नेत्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यात आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिला आहे. संघर्ष आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत होईल, शिवसेना अजून भाजपसोबतचं अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेसोबत संघर्ष होण्याचा प्रश्न नाही. त्यांकडे आता फक्त 16 आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत संघर्षाचा प्रश्न उपस्थित होत नाही, संघर्ष आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत होईल. शिवसेना तर भाजपच्यासोबतचं आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आमचा संघर्ष कसा होईल.

ऑक्टोबर 2019 ला जर त्यांनी सत्याची भूमिका घेतली असती, जनादेशाचा आदर केला असता…ठीक आहे, आता त्यांनी राजीनामा दिला आहे. बहुमत गमावलं आहे. लोकशाहीत बहुमत गमावल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. त्यांच्याबद्दल निश्चितपणे आमच्या मनात या अगोदरही प्रेम होत आणि भविष्यातही राहिल. नवीन सरकार जे अस्थित्वात येईल त्या सरकारला पाठींबा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर आमदारांनी ऐकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बदलाच्या राजकारणाचा आज अंत, असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा


First Published on: June 29, 2022 10:33 PM
Exit mobile version