करोना रोखण्याचे उपाय सुचवा आणि १ लाख जिंका – नरेंद्र मोदी

करोना रोखण्याचे उपाय सुचवा आणि १ लाख जिंका – नरेंद्र मोदी

जगभरात करोनाची दहशत पसरली आहे. अद्याप करोनावर कोणालाही लस शोधण्यात यश आलेले नाही. तसेच करोनावर लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. संशोधक दिवस-रात्र एक करून लस शोधण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना करोनावर उपाय सुचवण्यास आवाहन केले आहे. करोनाला रोखण्यासाठी उपाय सुचवा आणि १ लाख रुपये जिंका, असे मोदींनी ट्विट केले आहे. अवघ्या काही तासापूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटला आतापर्यंत शेकडो रिट्विट्स आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय मोदी सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी देखील पंतप्रधानांचे ट्वीट रिट्वीट केलंय.

First Published on: March 16, 2020 9:28 PM
Exit mobile version