राज्यात थंडीची हुडहुडी संपणार, उन्हाचा कडाका वाढणार

राज्यात थंडीची हुडहुडी संपणार, उन्हाचा कडाका वाढणार

राज्यात थंडीची हुडहुडी संपणार, उन्हाचा कडाका वाढणार

राज्यात अवकाळी पावसाच्या संकटानंतर आता पुन्हा कडाक्याचा उन्हाळा जाणवणार आहे. कारण मुंबईसह राज्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. दरम्यान वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कडाक्याच्या थंडीनंतर आता नागरिकांना उन्हाचे चटके जाणवणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत राज्यातील अनेक शहरांतील कमाल तापमान ३६ अं.से नोंदवण्यात आले आहे. तर किमान तापमानात १६ अं.से नोंद झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहारांमध्ये कमाव तापमान ३६ एवढे नोंदविण्यात आले आहे.या शहरांमध्ये वेंगुर्ला, जळगाव, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, वाशिम, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. तर इतर शहरांमध्ये किमान तापमान १६ ते २० अंश दरम्यान नोंदविण्यात येत आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, कमाल तापमान एवढे नोंदण्यात आल्याने राज्यातील हिवाळा आता परतू लागल्याची नोंद हवामान विभागाने सांगितले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यभरात कमाल तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तर मुंबईत कमाल तापमानात ३४ ते ३६ अंश नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास मुंबईकरांना उन्हाची झळ सोसावी लागत आहे.


हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पुणे पोलीस रक्षक नाहीत तर भक्षक आहेत- चित्रा वाघ

 

First Published on: February 25, 2021 1:03 PM
Exit mobile version