पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर समर्थकांचा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर समर्थकांचा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर दसरा मेळाव्यात एकच गोंधळ उडाला. बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होता. या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं आणि भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी मंचाजवळ धाव घेतली आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत आहे.

पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. गोंधळाचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दसरा मेळाव्याला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत सेल्फीचा आग्रह धरला, सेल्फी घेण्यासाठी स्टेजकडे धाव घेतली आणि यातूनच हा गोंधळ उडाल्याची माहिती समोर येत आहे.

मेळाव्याच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सुमारे आठ ते दहा मिनिटं हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर काही वेळानं आणखी पोलीस कुमक तिथं बोलवावी लागली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांची गाडी रवाना करण्यात आली.


हेही वाचा : बाळासाहेबांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत शिंदे गटाने डिवचले उद्धव ठाकरेंना


 

First Published on: October 5, 2022 4:13 PM
Exit mobile version