निवडणुकीत काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो, सुप्रिया सुळेंची राज्यसभा निवडणूक पराभवावर प्रतिक्रिया

निवडणुकीत काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो, सुप्रिया सुळेंची राज्यसभा निवडणूक पराभवावर प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा राज्यसभा निवडणुकीमध्ये सहाव्या जागेवर पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचा पराभव शिवसेनेला जिव्हारी लागला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना निवडणुकीमध्ये हार आणि जीत होत असते अशी प्रतिक्रया दिली आहे. आम्ही रिस्क घेतली परंतु त्यामध्ये यशस्वी झालो नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीतील पराभवावर प्रतिक्रिया देताना भाजपचं अभिनंदन केलं आहे. महाविकास आघाडीने आपला पराभव स्वीकारला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्याकडे संख्याबळ नसतानाही आम्ही ही संधी घेतली होती. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. परंतु भाजपला शुभेच्छा असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शरद पवार म्हणालेत की, आम्ही रिस्क घेतली होती. परंतू त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते इनटॅक्ट राहीली. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत. आम्ही याबाबत बसून चर्चा करणार आहोत असे सुप्रिया सुळे यांनी अपक्ष आमदारांच्या मुद्द्यावर म्हटलं आहे.

आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षं ते विरोधात होते तर अर्धी वर्षं सत्तेत आहेत. केंद्र सरकारद्वारे दडपशाहीचे राजकारण सुरु आहे. तसेच जास्त बोललात तर ई़डीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यामध्ये आपण काही वेळा जिंकतो तर काही वेळा हारतो. काही वेळा पराभव झाल्यावर लोकांना वाटतं यांची रणनिती चुकली आहे. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.


हेही वाचा : राज्यसभा निवडणूक निकाल : कोणत्या पक्षाला किती जागा, जाणून घ्या एका क्लिकवर

First Published on: June 11, 2022 4:40 PM
Exit mobile version