महापौरांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल

महापौरांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल

पुण्यातील आंबील ओढ्यालगत असलेल्या घरांवर तोडक कारवाई केल्यामुळे स्थानिकांनी कडाडून विरोध केला होता. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबील ओढा तोडक कारवाईवरुन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आंबिल ओढ्यावरील घरांवर कारवाई कोणी केली हे जनतेला माहित आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधा सुरु असलेल्या चौकशी आणि त्यांच्या घरावर केलेल्या छापेमारीवरुनही सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला आहे. पुण्यातील कारवाई कोणी केली आहे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता भाजपची आहे. यामुळे जर पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

राजकारण विचारांचे असावं

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरु आहे. ईडीने नागपुरच्या घरावर छापा टाकला असून कारवाई सुरु आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण हे विचारांच असलं पाहिजे. तपासयंत्रणांचा वापर विरोधकांसाठी करतात हे पुर्वी कधी पाहिले नव्हते परंतु आता यंत्रणांचा गैरवापर आपण बघतो आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचे असावे परंतु यांनी नवी नियमावली काढली आहे. आशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. मोठा पक्ष देशावर संकट असताना असे सुडाचं राजकारण करत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

तिसरी लाट रोखण्यात सरकार व्यवस्त

राज्यातील महाविकास आघाडीचे राजकारण हे प्रगतीचं आहे. सरकार लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहे. तिसरी लाट कधी येईल याची चर्चा आहे या तिसऱ्या लाटेला रोखण्यात आणि त्यावर उपाययोजना करण्यात सरकार व्यस्त असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

First Published on: June 25, 2021 2:42 PM
Exit mobile version