गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भाजपच्या विजयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुजरातमध्ये आमचा खऱ्या अर्थाने विजय आणि भाजपाची हार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्वमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेच्या आधी नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील, तर चांगली गोष्ट आहे. आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ वापरावा लागतो. तसेच त्यांचं नाव वापरावं लागतं यातच, आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे आणि भाजपाची हार सुद्धा आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

खासदार संजय राऊत यांनी चिथावणी खोर वक्तव्य करू नये असं, बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर सुषमा अंधारे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि महाराष्ट्र चाले अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी असच बोललं पाहिजेत. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे. तुम्ही काही बोलला तर आम्ही तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करू शकतो. जसे कल्याणमध्ये अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. या पद्धतीचे राजकारण ते करू शकतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं आम्हाला फार काही वाटत नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

महाप्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आहे, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यावर अंधारे म्हणाल्या की, काय कमाल आहे महाप्रबोधन यात्रा ही आम्ही सुरू केलेली. आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. शिंदे गटाची अडचण अशी आहे की, त्यांनी प्रचंड पैसा पेरला, प्रचंड माणसं फोडली. पण एवढी सगळी माणसं फोडून सुद्धा अजेंड्यावर काम करायला माणूस नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.


हेही वाचा : देशद्रोह्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी महाराष्ट्रद्रोह शिकवू नये, प्रवीण दरेकरांचा


 

First Published on: December 8, 2022 9:45 PM
Exit mobile version