घरताज्या घडामोडीदेशद्रोह्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी महाराष्ट्रद्रोह शिकवू नये, प्रवीण दरेकरांचा पलटवार

देशद्रोह्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी महाराष्ट्रद्रोह शिकवू नये, प्रवीण दरेकरांचा पलटवार

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगून महाराष्ट्र तोडला जातोय. महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेले जात आहेत, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केले होते. त्यांच्या या विधानाचा भाजपा आमदार आणि विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला. एक दोन महिन्यांत प्रकल्प पळवला आणि लगेच 150 च्या वर जागा मिळतात, हे बालिशपणाचे आणि अपरिपक्व असे एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याचे विधान आहे, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली.

महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, ज्या देशद्रोहीविरोधात हल्लाबोल करायला हवा होता, त्यांच्यावर विधिमंडळात हल्लाबोल करायला हवा होता, जागेच्या व्यवहारावरून देशद्रोह्यांशी साटेलोटे करून आज जेलमध्ये आहेत. ते जेलमध्ये गेल्यावरही मंत्रिमंडळात राहतात. देशद्रोह्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी महाराष्ट्रद्रोहपण शिकवू नये, असा पलटवार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीवर केलेल्या वक्तव्यचाही दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला. एक दोन महिन्यांत प्रकल्प पळवला आणि लगेच 150 च्या वर जागा मिळतात हे बालिशपणाचे, अपरिपक्व असे एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याचे विधान आहे. जे शिवसेना भवन ज्या दादरमध्ये येते तिथला आमदार, खासदार तुम्हाला टिकवता आला नाही. संभाजीनगर जो मुंबईनंतरचा बालेकिल्ला तेथील शिवसेनेचे पाचही आमदार उद्धव ठाकरे यांना टिकवता आले नाहीत. त्याचबरोबर कोकणात वैभव नाईक, राजन साळवी सोडले तर पालघरपासून ते गोव्याच्या सीमेपर्यंत शिवसेना टिकवता आली नाही. आनंद दिघे यांचा बालेकिल्ला ठाणे तिथेही वाताहत झाली. ज्यांना अस्तित्व टिकवता आले नाही त्यांनी जे. पी. नड्डा यांच्यासंबंधात बोलू नये, असा टोलाही दरेकर यांनी ठाकरे यांना लगावला. तसेच गुजरातचा विजय पंतप्रधान मोदीजी, अमित शहा यांच्यासह नड्डा यांचाही आहे. कारण ते देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. देशभर पक्षाचे नेतृत्व करतात. निवडणुकीत जय-पराजय होत असतो, असेही दरेकर म्हणाले.

कर्नाटक वादावर बोलताना दरेकर म्हणाले की, केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा काय झाले हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे माहित आहे. त्यामुळे स्वाभिमान आणि सीमाप्रश्नासंदर्भात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र या ठिकाणी संवेदनशील आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी आम्ही तडजोड करणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे आहे ते अशाच पद्धतीच्या दवंड्या पिटत राहणार असेही दरेकर म्हणाले.

- Advertisement -

त्याचबरोबर नाना पटोले यांनी धारावी पुनर्विकास टेंडरबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, टेंडरची प्रक्रिया असते, नॉम्स असतात. त्यामुळे नॉम्स आधारे प्रक्रिया पूर्ण होत असते. प्रक्रिया पूर्ण करूनच धारावीच्या पुनर्विकासाबाबत असा निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे. परंतु धारावीकरांचे भले होतेय यातही यांना पोटदुखी आहे आणि त्यामुळे रेल्वेच्या अशा प्रकारच्या गोष्टींवर टीका करत राजकारण साधण्याचा पटोले यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.


हेही वाचा : जी-२० परिषदेत मुंबईसह राज्याचे ब्रँडिंग करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -