सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते का? सुषमा अंधारेंचा सवाल

सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते का? सुषमा अंधारेंचा सवाल

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुस्लिम आणि मराठी मतं हवी आहेत. राजकीय स्वार्थासाठी चतुराईने शब्दांचा खेळ केला गेला आहे, असा घणाघात मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला होता. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांवर पलटवार केला आहे.

हेही वाचा – इलेक्ट्रॉनिक क्लस्टरनंतर राज्यात टेक्सटाईल पार्क उभारणार, फडणवीसांनी दिली इनसाइड माहिती

आम्ही मराठी मुस्लिम असा उल्लेख केला आहे. त्यावरून आशिष शेलार यांनी भ्रम निर्माण केला आहे. सरसंघचालक मशिदीमध्ये इस्लाम कबूल करायला गेले होते का? मोदींनी मुस्लिम टोपी का घातली होती? आशिष शेलारांनी हे सांगावं, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

मिहानमध्ये होणारा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. आतापर्यंत एकूण सात प्रकल्प बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. ते सण-उत्सव साजरे करण्यास व्यस्त केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सातत्याने नवरात्रीची आरती करणे, गणपतीची आरती करणे, पितृपक्षाचं जेवण करणे, यालाच जर आपल्या कर्तव्याची चौकट मानत असतील, तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं? सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल, तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा. किमान यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे व्यवस्थित लक्ष देतील, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

First Published on: October 31, 2022 4:15 PM
Exit mobile version