रायगडमधील संशयित बोटीचा मुद्दा विधानसभेत; आदिती तटकरेंची उपाययोजना करण्याची मागणी

रायगडमधील संशयित बोटीचा मुद्दा विधानसभेत; आदिती तटकरेंची उपाययोजना करण्याची मागणी

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये २ ते ३ एके-47 आढळली आहेत. रायगडमधील हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. रायगडमधील हा संशयित बोटीचा मुद्दा विधानसभेत राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांनी उपस्थित केला असून, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन महिती द्यावी. तसेच, एटीएसची टीम नेमावी आणि उपाययोजन करावी. तसेच, विशेष पथकाची नेमणूक करावी, अशी मागणी अदिती तटकरे यांनी केली. (Suspicious boat issue in Raigad in Assembly mla Aditi Tatkare demand to take measures)

विधानसभेत बोलताना आमदार अदिती तटकरे यांनी मुद्दा उपस्थित करत, रायगडच्या नागरिकांत्या सुरक्षेसाठी रेड अलर्ट जारी करण्याची मागणी केली आहे. उपाययोजना करण्यात यावी. या संशयित बोटींच्या सखोल चौकशीसाठी विषेश पथक नेमण्यात यावी. तसेच, काय उपाययोजन केली जाणार असल्याची माहिती द्यावी, असेही अदिती तटकरे यांनी सांगितले.

रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील हरीहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट शस्त्रांसह आढळून आल्याने गंभीर बाब समजली जात आहे. पोलिसांनी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हेही वाचा – सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच : जयंत पाटील

First Published on: August 18, 2022 3:19 PM
Exit mobile version