स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार?

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना लढत असते. शेतीच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी बऱ्याचवेळा या संघटनेने आंदोलन केले आहे. या संघटनेचा सध्या विस्तार वाढलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत महाआघाडीने फक्त एक जागा देऊ नये. महाआघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गृहित धरुन निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर एक जागा देऊन उपकाराची भाषाही महाआघाडीने करु नये, असे स्वाभिमानाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले आहेत. आता हा पक्ष सहा जागांवर निवडून येऊ शकतो, असा दावा तुपकर यांनी केला आहे. त्यामुळे महाआघाडीने जागा वाटपात दुजाबाव केल्यास किंवा वाटाघाटी फिस्कटल्यास शेतकऱ्यांच्या हितास्तव स्वाभिमानी वेळप्रसंगी स्वबळावर लढणार असेही रविकांत तुपकर म्हणाले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना खरच स्वबळावर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न पडला आहे. स्थानिक विश्रामगृह पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी सहा जागांवर निवडूण येईल असा दावा तुपकर यांनी केला आहे.

हेही वाचा – मंत्र्याच्या कार्यालयासमोर कांदे फेकणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

नेमकं काय म्हणाले तुपकर?

रविकांत तुपकर म्हणाले की, गेल्या साडे चार वर्षात भाजपने राबवलेले विविध धोरणांतून जनतेचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा अशी जनतेची अपेक्षा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांच्या या अपेक्षाचा आदर राखून जमिनीवर राहावे असे तुपकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर सत्ता परिवर्तनात शेतकऱ्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असून पाच राज्यांच्या निकालांनी ते सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचे प्रभूत्व आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सोडण्याची भाषा महाआघाडीने करु नये, असे तुपकर म्हणाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडमुकीसाठी बुलडामा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली आणि धुळे या सहा जागांवर दावा केला आहे. हा दावा शेवटपर्यंत असून त्यामध्ये कुठलाही बदल स्वाभिमानीला मान्य नाही. तसेच राजू शेट्टींशिवाय जिंकूण येणे महाआघाडीला शक्य नाही. त्यामुळे महाआघाडीने गृहित धरुन स्वाभिमानीला एक जागा दिली तर स्वाभिमानी स्वबळावर सहा जागांवर निवडणूक लढवेल असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.


हेही वाचा – कांद्याच्या २०० रुपयांच्या अनुदानावर टीका

First Published on: December 23, 2018 7:48 PM
Exit mobile version