महाराष्ट्राच्या १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठीही तामिळनाडू पॅटर्न?

महाराष्ट्राच्या १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठीही तामिळनाडू पॅटर्न?

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. कोरोनाबाधितांची संख्यांसह मृतांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच अनुषंगाने १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर १०वी, १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. जून महिन्यात १०वीच्या आणि १२वीच्या मे महिन्याच्या अखेरीस परीक्षा होतील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. पण त्यानंतर तामिळनाडू पॅटर्न राज्यात येणार की असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तामिळनाडूप्रमाणे १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा आग्रह मंत्रीमंडळात धरल्याचा होता. त्यामुळे १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

१०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत टोपेंना विचारले असता ते म्हणाले की, ‘मला असं वाटतं की, ‘जान है तो जहान है’ किंवा ‘सर सलामत तो पगडी पचास’ त्यापद्धतीने सर्वच निर्णय आपल्या जिवाच्या अनुषंगाने घेतले पाहिजे. आपलं जीवन सुरक्षित पाहिजे, आपलं आरोग्य सुरक्षित पाहिजे म्हणून परीक्षा आज नाही पुन्हा उद्या होतील. आता नाही पुढच्या चार महिन्यात होतील. तसंच नाही झालं तर, तामिळनाडूमध्ये जसा १०वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेतला, तोही आग्रह मी मंत्रीमंडळात धरला. तामिळनाडूमध्ये १०वीच्या सर्व मुलांना प्रमोट करू टाकलं. यात काही अडचण नाही आहे, पुढे परीक्षा घेता येईल. असे निर्णय गरजेप्रमाणे घ्यावे लागतात. मी वर्षा गायकवाड यांना बोललो होतो, त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असेल. या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.’

काय आहे तामिळनाडू पॅटर्न?

गेल्या वर्षी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी १०वीच्या बोर्डाच्या परीक्षा ने घेण्याचा निर्णय घेतला होता. शाळेत अर्धवार्षिक आणि तिमाही परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आले होते. सहामाही परीक्षेला ८० टक्के आणि तिमाही परीक्षेला २० टक्के वेटेज देऊन १०वीच्या विद्यार्थ्यांना तामिळनाडूत प्रमोट केले होते.


हेही वाचा – गरजेनुसार लिक्विड ऑक्सिजन टँक बसवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना


 

First Published on: April 12, 2021 5:26 PM
Exit mobile version