घरताज्या घडामोडीगरजेनुसार लिक्विड ऑक्सिजन टँक बसवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

गरजेनुसार लिक्विड ऑक्सिजन टँक बसवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालये फुल्ल झाली आहेत. तसेच कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन तसेच अनेक साधनसामुग्रीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लिक्विड ऑक्सिजन टँक उपलब्ध नाही आहेत. तसेच धुळ्या प्रमाणे अनेक जिल्ह्यात शवदाहिनीही उपलब्ध नाही आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना गरजेप्रमाणे सुविधा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रेमडेसिवीरचा अयोग्य वापर टाळावा आणि ऑक्सिजन कमी किंमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय ऑक्सिजनसाठी २ ते ३ कंपन्यांशी करार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी टोपेंनी दिली.

आज ऑक्सिजनच्या तुटवड्या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी लिक्विड ऑक्सिजन टँकबाबत निर्णय घेण्यात झाला. ऑक्सिजनचे मॉनिटरिंग झाले पाहिजे, असे टोपे म्हणाले. तसेच जिथे गरज आहे, तिथे लिक्विड ऑक्सिजन टँक बसवावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती टोपेंनी दिली. शिवाय शवदाहिनीसाठी कोणत्याही योजनेतून पैसे खर्च होऊन शकतात.

- Advertisement -

रेमडेसिवीर १४०० रुपयांच्या आता विकले पाहिजे

टोपे पुढे म्हणाले की, ‘५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार आहेत. जिल्हाधिकारी आणि आयसीएमआरच्या अंतर्गत इंजेक्शनचे वाटप केले जाईल. अनेक ठिकाणी ४ ते ५ हजार रुपयांमध्ये इंजेक्शन विकले जात आहे. परंतु रेमडेसिवीर इंजेक्शन १४०० रुपयांच्या आत विकले पाहिजे. ७ कंपन्या इंजेक्शनच काम करत आहे. पण इंजेक्शन १४०० रुपयांच्या पुढे विकले गेले नाही पाहिजे.’

…त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा

‘ज्या गतीने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन गरजेचा आहे. राज्यात सध्या लॉकडाऊन हाच एक पर्याय आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गोरगरिबांचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय घेतली, असे राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा विचार सुरू

१०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. यासंदर्भात टोपे म्हणाले की, तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट प्रमोट करण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यातील १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा विचार सुरू आहे.

साताऱ्यामध्ये अतिरिक्त ऑक्सीजन निर्मितीसाठी के नॉयट्रोक्सीजन कंपनीला फक्त १४ तासांत वाढीव वीजभार

सातारा येथील ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या के नॉयट्रोक्सीजन कंपनीला अतिरिक्त चार टन ऑक्सीजनचे उत्पादन करण्यासाठी तब्बल २६० केव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार विक्रमी १४ तासांमध्ये कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणच्या सातारा येथील अभियंता व कर्मचाऱ्यांनी केली आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सध्या उद्रेक सुरु असल्याने वीज जोडणी असो की विजभार वाढ लवकरात लवकर करून देण्याच्या ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सूचना दिल्या असून त्यामुळे राज्यभरातील यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून विक्रमी वेळेत रोहित्र बदलणे, भूमिगत वायर टाकणे ही कामे करणाऱ्या महावितरणचे आभार या कंपनीने एक पत्र पाठवून मानले आहेत.


हेही वाचा – १० वी, १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -