टॅक्सीचा मीटर पडला, तरच घरात जेवण बनतं…

टॅक्सीचा मीटर पडला, तरच घरात जेवण बनतं…
करोनाचा पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना टॅक्सी आणि रिक्षांचा उपयोग करू शकतात. अशी  सशर्त व्यवसाय करण्याची परवानगी शासनाने टॅक्सी आणि रिक्षा चालकांना दिलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्येक्षात पोलिसांची दंडुकेशाही याचा टॅक्सी चालकांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. परिणामी, शहरातील काही टॅक्सी चालकांनी व्यवसाय बंद ठेवत घरी बसणे पसंत केले आहे.
संपूर्ण जगात करोना विष्णू विषाणूने हाहाकार माजविला आहे. तसेच मुंबईसह राज्यात करोन बाधित रुग्णांचा आकडा 135 वर पोहचला असून करोनाचा आजार बळावू नये म्हणून विविध पातळ्यांवर राज्य आणि केंद्र सरकार खबरदारी घेत आहेत. तसेचबकरोनाचा मुंबईतील वाढता आकडा आणि पोलिसांची दंडुकेशाही याचा टॅक्सी चालकांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून  येत आहे. शासनाकडून वारंवार टॅक्सी आणि रिक्षांना सशर्त व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काही टॅक्सी चालकांकडून नियमाचा भंग होत असून त्याची शिक्षा प्रामाणिक टॅक्सी चालकांना मिळत असल्याचे टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे.आधीच कोरोनाची रुग्ण ओळखणे कठीण झाले आहे. त्यात लॉक डाऊनमुळे व्यवसाय नाही. अशा परिस्थितीत तुटपुंज्या व्यवसायासाठी जीव धोक्यात घालणे पटत नाही. म्हणून धंदा बंद करून घरी बसण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक टॅक्सी चालकांनी घेतला आहे. अशी माहिती भायखळ्यातील एका टॅक्सी चालकाने दैनिक आपलं महानगरला दिली आहेत.

पोलिसी खाक्याचा दबावामुळे सेवा देणे बंद

मुंबईतील अनेक  टॅक्सी चालकाने पोलिसांकडून त्रास होत असल्याचे म्हणणे आहेत.घोडपदेव, परळ, दादर या परिसरातील चौकामध्ये टॅक्सी उभी केल्यास पोलिसांकडून दमदाटी केली जात आहे. रुग्णांनाच मदत करायची असेल, तर केईएम, टाटा रुग्णालयांबाहेर उभे राहा, असे सल्लेही पोलीस देत आहेत. मात्र रुग्णालयांसमोरून भाडे घेऊन इतर ठिकाणी गेल्यास पुन्हा प्रवाशांच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे टॅक्सीत केवळ दोनच प्रवासी बसवण्याची मुभा असल्याने दिवसभरात केवळ २०० ते २५० रुपयांचा धंदाच होत आहे. परिणामी, जीवावर उदार होऊन २०० रुपयांचा गॅस भरून तितक्याच पैशांचा धंदा करण्याऐवजी घरी बसून राहणे अधिक चांगले वाटते आहे.
लॉक डाऊनमुळे मुंबईतील मोठ्या संख्येने खाजगी कार्यालये, आस्थापना आणि औद्योगिक कारखाने बंद असल्याने टॅक्सी आणि रिक्षांचे मीटर डाऊन आहे. अशा परिस्थितीत टॅक्सी व रिक्षा चालक व मालकांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात सरकारने गरिब कल्याण योजनेतून टॅक्सी व रिक्षा चालकांना वगळले आहे. त्यामुळे टॅक्सी व रिक्षा चालकांचाही या योजनेत समावेश करण्याची मागणी मुंबई चालक-मालक सेना युनियनने केला आहे.
First Published on: March 27, 2020 8:01 PM
Exit mobile version