मुलाला ‘गे’ चिडवल्यामुळे, शिक्षिकेतील ‘आई’ संतापली

मुलाला ‘गे’ चिडवल्यामुळे, शिक्षिकेतील ‘आई’ संतापली

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य-cliparts.co)

पुण्याच्या निगडी येथील सेंट उरसूला या शाळेमध्ये नुकताच एक विचित्र प्रकार घडला. या शाळेत शिकवणाऱ्या एका महिला शिक्षिकेच्या मुलाला दुसऱ्या एका विद्यार्थ्याने ‘गे’ असे संबोधले. यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. शिक्षिकेने मारहाण केलेल्या मुलाचं वय केवळ १३ वर्ष असून, त्याच्या पालकांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. शिक्षिकेमने केलेल्या मारहाणीमध्ये हा विद्यार्थी किरकोळ जखमीदेखील झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. शाळेतील शिक्षकच जर विद्यार्थ्यांना अशाप्रकारे मारहाण करत असतील तर नक्कीच ही गंभीर बाब आहे.

सविस्तर घटना काय?

 निगडीच्या सेंट उरसूला शाळेत शिकणारा तीर्थ हा विद्यार्थी (बदललेले नाव) आणि ज्याला मारहाण झाली तो विद्यार्थी हे दोघेही एकाच स्कूल व्हॅनमधून येतात. तीर्थची आई याच शाळेमध्ये शिक्षिका आहे. सोमवारी व्हॅनमधून येत असताना अन्य काही मुलांनी तीर्थला ‘गे’ म्हणून चिडवलं. मात्र, चिडलेल्या तीर्थने ज्याला मारहाण झाली त्याच विद्यार्थ्याचं नाव घेत सगळा प्रकार आपल्या शिक्षिका आईला सांगतिला. हे ऐकल्यानंतर त्या शिक्षिकेने आपल्याला बोलावून गालावर आणि पोटात खूप मारल्याचा तसंच शिवीगाळ केल्याचा आरोप जखमी विद्यार्थीने केला. ही घटना समजताच त्याच्या पालकांनी निगडी पोलिसात शिक्षिकेविरुद्द तक्रार दाखल करत, त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मात्र, याप्रकरणी सेंट उरसुला शाळा प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे.


जाणून घ्या: ‘मुळा’ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

First Published on: October 23, 2018 8:01 PM
Exit mobile version