पंढरपुर पोटनिवडणुकीत शिक्षकास कोरोनाने गाठले, शिक्षकास कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पंढरपुर पोटनिवडणुकीत शिक्षकास कोरोनाने गाठले, शिक्षकास कुटुंबातील चौघांचा मृत्यू

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने Herd Immunity शक्य आहे का?

पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. निवडणुकी संपल्यापासून शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्य़ेचा विस्फोट होत असून मृतांची संख्याही वाढत आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. याचदरम्यान धक्कादायक म्हणजे पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी काम करणाऱ्या एका शिक्षकासह त्याचा कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक मतदानाच्या ड्युटीवर होते. परंतु ही ड्युटी संपून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांचावर पंढरपूरमध्ये कोरोनावर उपचार सुरु होते. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. दरम्यान प्रमोद माने यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत दाखल करण्यात आले. मात्र अनेक प्रयत्न करुनही अखेर प्रमोद माने यांची कोरोनाशी झुंज संपली आणि मृत्यू झाला.

याच दरम्यान कुटुंबातील पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांचावरही कोरोना उपचार सुरू होते. परंतु या उपचारादरम्यान माने यांच्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. प्रमोद माने यांचे वडील वसंतराव, आई शशिकला आणि मावशी जया घोरपडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुलाने कोरोनावर मात केली. परंतु या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे माने यांचे हसते खेळते कुटुंबचं या कोरोनाने उद्धस्त केले आहे.


 

First Published on: May 8, 2021 3:11 PM
Exit mobile version