लय भारी जुगाड! शिक्षीकेच्या या जुगाडाचं सोशल मीडियावर कौतुक!

लय भारी जुगाड! शिक्षीकेच्या या जुगाडाचं सोशल मीडियावर कौतुक!

देशात झालेल्या कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मार्चपासून शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. पण यावर उपाय म्हणून शाळांनी ऑनलाईन क्लासचा पर्याय निवडला आहे. मात्र सध्या या ऑनलाईन क्लास घेण्यासाठी एका शिक्षीकेने केलेला जुगाड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रायपॉड नसताना एका शिक्षीकेने कसा जुगाड केला हे या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. पुण्यातील रसायनशास्त्राच्या शिक्षिका मौमिता बीने यांनी ऑनलाइन क्लास घेण्यासाठी एक भन्नाट आयडिया वापरली आहे. त्यांनी आपला व्हिडीओ लिंकडींन वर शेअर केला आहे. पण यावर त्यांनी अगदी भन्नाट पद्धतीनं उपाय शोधला आहे हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकते. नेटकऱ्यांनाही हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत या शिक्षीकेचं कौतुक केलं आहे.

असा केला जुगाड

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन दोऱ्यांच्या आधारे हँगर लटकवून त्यामध्ये मोबाईल अडकवला आहे. या मोबाईवरून लाईव्ह सुरू आहे. या व्हिडीओ आपण पाहू शकता शिक्षिका फऴ्यावर सूत्र लिहून शिकवत आहेत.


हे ही वाचा – Samsung चा सर्वात स्वस्त फोन आला, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत!


 

First Published on: June 10, 2020 6:54 PM
Exit mobile version