तारापूरच्या भगेरीया इंडस्ट्रीज कंपनीत भीषण स्फोट, २ कामगारांचा मृत्यू

तारापूरच्या भगेरीया इंडस्ट्रीज कंपनीत भीषण स्फोट, २ कामगारांचा मृत्यू

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २ कामगार ठार तर काही कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नं डी १७ वरील भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत उत्पादन सुरू असताना संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बॉयलरचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ पेक्षा अधिक कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बोईसर येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काही कामगारांची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

कंपनीत सकाळी ३ वाजता कपड्याच्या डाईंग प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या ऍसिडचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान बॉयलरचे तापमान आणि दबाव क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता कंपनी व्यवस्थापनाकडून वर्तवली गेली आहे.


हेही वाचा : माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


 

First Published on: October 26, 2022 7:17 PM
Exit mobile version