शिर्डीत दहशतवाद्याला अटक, पंजाब आणि महाराष्ट्र ATSची कारवाई

शिर्डीत दहशतवाद्याला अटक, पंजाब आणि महाराष्ट्र ATSची कारवाई

शिर्डी – महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतावाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत एका दहशतवाद्याला अटक केली. ही कारवाई शिर्डीत करण्यात आली. त्या दहशतवाद्याचे नाव राजिंदर असे आहे.

१६ ऑगस्टला पंजाबमध्ये पोलिस दलातील पोलीस निरीक्षकाच्या गाडीला IED लावून ती उडवण्याचा कट त्याने आखला होता, असा आरोप त्यांच्यावर आहे. पंजाब ATS आणि महाराष्ट्र ATS ने एकत्र कारवाई करत राजेंदरला अटक केली. आरोपीला पंजाब ATS च्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

दोन दिवस आगोदर दिल्लीत कारवाई –

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर, पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी रविवारी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. दिल्लीत कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात बसलेल्या गुंडांच्या चार दहशतवाद्यांना दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले दहशतवादी कॅनडाचा गँगस्टर अर्शदीप सिंग उर्फ ​​अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुरजंत सिंग उर्फ ​​जंटा यांच्याशी संबंधित आहेत. पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स युनिट आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीने गुप्तचर मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. यापार्श्वभूमीर ही कारवाई शिर्डीत महाराष्ट्र आणि पंजाब पोलीसांनी केली.

First Published on: August 20, 2022 3:25 PM
Exit mobile version