टीईटी घोटाळा : अब्दुल सत्तारांच्या चारही मुलांची प्रमाणपत्रं रद्द

टीईटी घोटाळा : अब्दुल सत्तारांच्या चारही मुलांची प्रमाणपत्रं रद्द

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली. त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या उमेदवारांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. परंतु, सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. या उमेदवारांमध्ये आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुली हिना आणि उजमा तसेच, त्यांचा मुलगा व आणखी एका मुलीचे नाव असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौघांचीही प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. (Tet Exam Scam Mla Abdul Sattar Two Daughters Certificate Get Cancelled)

हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. तसेच, त्यांची आणखी एक मुलगी आणि मुलगाही अपात्र ठरले आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या चारही मुलांचा समावेश आहे. यां चोघांची नावे समोर आली असली, तरी त्यांनी नेमक्या कोणत्या एजंटला पैसे दिले याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीच वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, “बदनामीसाठी हा सगळा कट रचण्यात आला आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा. या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचे काम कुणी करु नये. चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी” असे सत्तार यांनी म्हटले.

दरम्यान, या यादीत संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असल्याचे समजते. यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत.

नेमके प्रकरण काय?

दोन दिवसांपुर्वी म्हणजेच 2019 साली पुणे सायबर सेल पोलिसांनी टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. 2019 मध्ये झालेल्या टी. ई. टी. म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील सात हजार 800 परीक्षार्थी अपात्र असतानाही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे निदर्शास आले. त्यानंतर त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019-20 मध्ये पैसे देऊन पात्र ठरलेल्या 7 हजार 800 उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पोलिस व शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवरांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार, गुण वाढवून देणे आणि थेट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले होते. पात्र नसताना पैसे घेऊन पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळविलेल्या 7 हजार 800 जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाला दिली होती.


हेही वाचा –  ईडीविरोधातील आंदोलनावरून शिवसेनेकडून काँग्रेसचे कौतुक तर राष्ट्रवादीवर निशाणा

First Published on: August 8, 2022 10:34 AM
Exit mobile version