‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करा – भाजप

‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करा – भाजप

‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करा - भाजपची मागणी

मराठी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलीवूडपर्यंत सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘ठाकरे’ या चित्रपटाची. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपच्या चित्रपट आघाडीने राज्याच्या सास्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे. या खात्याचे मंत्री असलेल्या विनोट तावडे यांना भाजपच्या चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. त्यामुळे ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन विनोद तावडेंनू दिले आहे.

शिवसेना – भाजपात युती होणे नाही

‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा ही भाजपची मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मानण्यात येत आहे. कारण, शिवसेना – भाजपात युती होण्याची चिन्हे दिसत नाहीत. युतीवरुन दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला गोंजारण्यासाठीच भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाचे मंत्री तावडे यांच्याकडे ही मागणी केल्याची चर्चा आहे. कारण, शिवसेना नेते संजय राऊत हे ठाकरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. कायमच भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या राऊतांना गळ घालण्यासाठी भाजपाची ही खेळी असल्याचे बोले जात आहे.

बाळासाहेब आणि मीनाताईंचा ४८ वर्षांचा प्रवास

१३ जून १९४८ मध्ये बाळासाहेबांच मीनाताई ठाकरे यांच्याशी विवाह झाला. २० एप्रिल १९९६ ला बाळासाहेबांचे थोरले चिरंजीव बिंदूमाधव यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलाच्या मृत्यूनंतर सहाचं महिन्यांनी मीनाताईंनी अखेरचा श्वास घेतला. या ४८ वर्षांच्या प्रवासात मीनाताईंनी सदैव बाळासाहेबांना साथ दिली. संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवून प्रेमाने सगळ्यांचा सांभाळ केला.

अमृता राव साकारणार मीनाताईंची भूमिका

मीनाताईंच्या या भुमिकेसाठी अमृता रावची निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीबद्दल ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी अमृता राव एकदम योग्य निवड असल्याचं म्हटलं होतं. मात्र अमृताने याबाबत कधीच प्रतिक्रीया दिली नव्हती. मात्र झारखंडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ती मीनाताईंची भूमिका करत असल्याचं अमृताने जाहीर केलं आहे.


वाचा – ठाकरे’ सिक्वल येतच राहणार

पहा – ‘ठाकरे’ चित्रपटाचा उद्देश लवकरच कळेल

First Published on: January 9, 2019 9:27 AM
Exit mobile version