ठाकरे सरकार लबाड सरकार; फडणवीसांचा घणाघात

ठाकरे सरकार लबाड सरकार; फडणवीसांचा घणाघात

दुर्घटनेला बीएमसी, सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारचं नाव लिहिलं जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचे मीटर न कापण्याचे आदेश द्यायचे आणि शेवटच्या दिवशी निर्णय बदलायचे. ग्रामीण शहरी भागातील नागरिकांना सरकारने विजेचा झटका दिला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना लबाड सरकार म्हणत आहोत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने केलेली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

पीक विमा कंपन्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. विमा कंपनीवर जाऊन शिवसेना आंदोलन करत होती आता शिवसेना शांत का? हे सरकार लबाड सरकार आहे. सरकारमध्ये कुठही ताळमेळ नव्हता. ओबीसीच्या जागा कमी केल्या. मराठा आरक्षणात सरकार कमी पडत आहे. दोन्ही विषयात सरकार कमी पडत आहे. हा सरकारचा खरा चेहरा बाहेर आला आहे. हे सरकार मारून मुटकून एकत्र आलेलं आहे. काँग्रेसचे एकही मंत्री पत्रकार परिषदेत नाही. माननीय मुख्यमंत्री या सभागृहाला गंभीरपणे घेत नाहीत ते सभागृहात येत नाही. सभागृहात ताणतणाव आल्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर लोक बसून उपाय काढत असतात पण मुख्यमंत्री नवीन पध्दत आणत आहेत, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा-जिल्हाधिकारयांच्या आदेशाला केराची टोपली


 

First Published on: March 10, 2021 8:36 PM
Exit mobile version