ठाण्यात शिवसेनेत राहिल्या फक्त माजी नगरसेविका नंदिनी विचारे

ठाण्यात शिवसेनेत राहिल्या फक्त माजी नगरसेविका नंदिनी विचारे

ठाणे महापालिकेतील ६६ शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन त्यांना समर्थन जाहीर केले. त्यामुळे ठाणे शहरातील शिवसेनेला खिंडार पडले असताना, मात्र माजी नगरसेविका आणि खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या इतर माजी नगरसेवकांसोबत न जाता, त्या एकट्याच शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेच्या तिकीटीवरून राजन विचारे हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. ते पुढे ठाण्याचे महापौर ही झाले. त्यानंतर शिवसेनेने त्यांना आमदार आणि खासदार की दिली. सलग दोन वर्षे खासदार म्हणून ते ठाण्यातून लोकसभेत निवडून गेलेले आहेत. त्यातच त्यांची बुधवारी लोकसभेच्या प्रतोदपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे या ही सलग दोन वेळा ठामपावर निवडून गेल्या होत्या. मात्र त्यांच्याकडे पक्षाने कोणतीही मोठी जबाबदारी दिलेली नव्हती. पण, पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येत आहेत. ठाणे पश्चिम चरई चंदनवाडी प्रभागातून त्या सलग २ वेळा ठाणे पालिकेवर शिव सेनेकडून निवडून आल्या आहेत.

भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात बुधवारी रात्री ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ‘नंदनवन’ या निवासस्थानावर भेट घेत, त्या सर्वांनी शिंदे यांच्या गटात जाहीर रित्या प्रवेश केला.

दरम्यान पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत, शिवसेनेतून ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची पहिली हकालपट्टी झाली. त्याच्या काही दिवसांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची कारवायीचा ठपका ठेवत शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्या दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

First Published on: July 7, 2022 1:37 PM
Exit mobile version